'काही जण फक्त वयानं वाढले'

काही जण फक्त वयानं वाढले आहेत, पण त्यांना समज मात्र आली नाही, अशा कठोर शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Updated: Mar 3, 2016, 03:50 PM IST
'काही जण फक्त वयानं वाढले' title=

नवी दिल्ली: काही जण फक्त वयानं वाढले आहेत, पण त्यांना समज मात्र आली नाही, अशा कठोर शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

काही जणांना गोष्टी सांगितल्या तरी समजत नाहीत, काही समजतात पण खूप वेळ लागतो, असा टोलाही पंतप्रधानांनी राहुल गांधींना लगावला आहे. 

बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या योजनांवर टीका केली होती. त्याला आता पंतप्रधानांनी प्रत्युत्तर दिलं.

'मेक इन इंडियाची खिल्ली नको'

पंतप्रधानांनी मेक इन इंडियाचा बब्बर शेर तयार केला, ज्यामध्ये घड्याळ आणि चाकं फिरतात पण नोकऱ्यास कुठे आहेत, असं राहुल गांधी लोकसभेत म्हणाले होते. 

पण मेक इन इंडिया देशासाठी आहे, त्याची खिल्ली उडवू नका, त्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करायला मदत करा, असं मोदी म्हणाले. 

मनरेगावरूनही टोला

मनरेगा योजनेवर राहुल गांधींनी केलेल्या टीकेलाही मोदींनी प्रत्युत्तर दिलं, गरीबी हटवण्यासाठी आपण प्रयत्न केले असते, तर मनरेगा योजनेची काहीच आवश्यकता नव्हती, असा टोला मोदींनी हाणला.