५०० रुपयांत 'मुलगा' होण्याची गॅरंटी देणारा डॉक्टर गजाआड!

५०० रुपयांमध्ये मुलगा होण्याची गॅरंटी देणाऱ्या एका डॉक्टरला हरियाणात अटक करण्यात आलीय. हरियाणामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. हरियाणाच्या रटौली या गावात पोलिसांनी स्वास्थ्य विभागाच्या एका टीमच्या मदतीनं टाकलेल्या धाडीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

Updated: Nov 20, 2015, 04:59 PM IST
५०० रुपयांत 'मुलगा' होण्याची गॅरंटी देणारा डॉक्टर गजाआड! title=

चंदीगड : ५०० रुपयांमध्ये मुलगा होण्याची गॅरंटी देणाऱ्या एका डॉक्टरला हरियाणात अटक करण्यात आलीय. हरियाणामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. हरियाणाच्या रटौली या गावात पोलिसांनी स्वास्थ्य विभागाच्या एका टीमच्या मदतीनं टाकलेल्या धाडीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

स्वास्थ्य विभागाच्या म्हणण्यानुसार, या गावातून डॉक्टरविषयी अनेक तक्रारी आल्या होत्या. हा डॉक्टर आपल्याकडे 'मुलगा' होण्याचं औषध देत असल्याचा दावा करत असल्याचं या तक्रारींत म्हटलं गेलं होतं.

त्यानंतर, टीमनं एक महिला बनावट पेशंट या डॉक्टरकडे पाठवली. या महिलेनं आपण गर्भवती असून आपल्याला मुलगा हवाय असं डॉक्टरला सांगितलं. या महिलेलाही डॉक्टरनं पाचशे रुपये घेऊन काही औषधंही दिली. दुसऱ्यांदा पुन्हा एकदा ही महिला या डॉक्टरकडे गेली तेव्हा डॉक्टरनं महिलेला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे, दुसऱ्यांदा औषधामुळे मुलगाच होईल, असंही त्यानं या महिलेला सांगितलं.

महिलेनं याची सूचना आरोग्य विभागाला देताच टीम घटनास्थळी दाखल झाली. तेव्हा, आरोपी त्यांच्या तावडीतून निसटला. आरोग्य विभागानं पोलिसांना याची सूचना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या बनावट डॉक्टरला अटक केली. महत्त्वाचं म्हणजे, या डॉक्टरकडे प्रॅक्टीस परवानगीही नव्हती. त्याच्यावर इंडियन मेडिकल काऊन्सिल अॅक्टनुसार कारवाई करण्यात येणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.