चंदिगड : हरियाणा सरकारने फतेहाबादच्या एसपी संगिता कालिया यांची तडकाफडकी बदली केली. कॅबिनेट मंत्री अनिल विज यांच्या सोबत झालेल्या शाब्दीक चकमकीनंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आला आहे.
अधिक वाचा : हरियाणाच्या मंत्र्याने महिला एसपीला म्हटले, गेट आऊट, उत्तर मिळाले 'जाणार नाही
अनिल विज यांनी एसपी संगिता कालिया यांना गेट आऊट म्हटलं होतं पण संगिता कालिया यांनी माझी काही चुक नसल्याचं म्हणत बैठकीमधून जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर मंत्री महोदय स्वत:च निघून गेले होते.
हरियाणा सरकारने संगिता कालिया यांची बदली योग्य असल्याचं म्हटलं आहे. सरकारचे प्रवक्ते जवाहर यादव यांनी म्हटलं आहे की कोणाताही पोलीस अधिकारी हा मंत्री पेक्षा मोठा नसतो.
हरियाणाचे डीजीपी यशपाल सिंघल यांनी म्हटलं आहे की, सरकारने सगळे व्हिडिओ फुटेज बघूनच हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक व्यक्तीचा आदर करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे.
काय घडलं पाहा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.