गर्ल्स कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ‘छुपा कॅमेरा’!

दिल्लीतील मुलींच्या ‘जेएसएस’ महाविद्यालयाच्या होस्टेलच्या वॉशरुममध्ये कॅमेरा आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. 

Updated: Sep 19, 2014, 01:49 PM IST
गर्ल्स कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ‘छुपा कॅमेरा’! title=

नवी दिल्ली : दिल्लीतील मुलींच्या ‘जेएसएस’ महाविद्यालयाच्या होस्टेलच्या वॉशरुममध्ये कॅमेरा आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. 

राजधानी दिल्ली समवेत मुलींची सुरक्षा हा मुद्दा आता ऐरणीवर आलाय. छुप्या कॅमेऱ्याच्या साहाय्यानं मॉल्समधल्या चेंजिंग रुममध्ये, वॉशरुममध्ये छायाचित्रण करणं हा यातील एक भाग... अनेक वेळा अशी कृत्यं समोर आलीत. 

नोएडा सेक्टर ६२ मध्ये असलेल्या ‘जेएसएस’ महाविद्यालयाच्या होस्टेलच्या एका रुममध्ये एक कॅमेरा जप्त करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे मुलींच्या वॉशरुममध्ये हा कॅमेरा लावण्यात आला होता. इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना जेव्हा याचा सुगावा लागला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.  

विद्यार्थीनींनी तातडीनं महाविद्यालयाच्या मॅनेजमेंटला याबद्दल तक्रार केलीय. दोषींविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना या प्रकरणात चौकशी आणि कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. 

हॉस्टेलमध्ये सुरक्षा व्यवस्था असूनही मुलींच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा आलाच कसा? या प्रश्नावर मात्र अद्याप उत्तर मिळालेलं नाही. पोलिसांना महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केलाय. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.