तीन महिन्यानंतरही सुब्रतो रायला कोर्टाचा 'सहारा' नाहीच!

घरातच नजरकैद करण्याची मागणी करत सुब्रतो राय यांनी कोर्टात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं आज पुन्हा एकदा फेटाळून लावलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 4, 2014, 05:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
घरातच नजरकैद करण्याची मागणी करत सुब्रतो राय यांनी कोर्टात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं आज पुन्हा एकदा फेटाळून लावलीय. त्यामुळे ‘सहारा’च्या अध्यक्षांना अजूनही तुरुंगातच राहावं लागणार आहे. याशिवाय, सुप्रीम कोर्टानं आपल्याच जुन्या आदेशांना सुधारत ‘सहारा’ला भारतातील नऊ शहरांमधली आपली स्थावर मालमत्ता विकण्याची परवानगी दिलीय.
सुब्रतो राय हे गेल्या 4 मार्चपासून तिहार तुरुंगात बंद आहेत. कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे, राय यांच्या जामीनासाठी 5000 करोड रुपये नगद आणि तेवढ्याच रकमेची बँक गॅरंटी देण्याची तयारी ‘सहारा’नं दाखवली होती. परंतु, आज कोर्टानं पुन्हा ‘सहारा’ची याचिका फेटाळत लावलीय.
यापूर्वी, कोर्टानं ‘सहारा’ला परदेश स्थित आपल्या हॉटेलांमधली भागीदारी विकून पैसे उभारण्याची व्यवस्था करण्यासाठी ‘देनदार बँक ऑफ चायना’शी संपर्क करण्याचीही परवानगी दिली होती.
सहारानं आपल्या नव्या प्रस्तावात, पाच दिवसांच्या आत 3000 करोड रुपये आणि त्यानंतर 30 दिवसांच्या आत 2000 करोड रुपये जमा करण्याची तयारी दर्शविली होती. लंडन स्थित एक हॉटेल आणि न्यूयॉर्क स्थित दोन हॉटेलमधली आपली भागीदारी विकून 60 दिवसांच्या आत उरलेल्या 5000 करोड रुपयांसाठी बँक गॅरंटी देईल, असं सहाराचं म्हणणं होतं. सोबतच कोर्टानं ‘सहारा’ समुहाला पैसे उभारण्यासाठी भारतातील नऊ मालमत्तांची विक्री तसंच अॅम्बी व्हॅलीमधील काही संपत्ती गहाण ठेवण्याचीही परवानगी दिली होती.
65 वर्षीय सुब्रतो राय यांना गुंतवणूकदारांचे 20,000 करोड रुपयांहून अधिक पैसे परत करण्याचे आदेश धुडकावून लावल्यानं तुरुंगात धाडण्यात आलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.