टीम इंडियाच्या पराभवामुळे नैराश्यग्रस्त 'फॅन'ची आत्महत्या

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सिंचन विभागाच्या एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केलीय. धक्कादायक म्हणजे, गुरुवारी सिडनीमध्ये वर्ल्डकप 2015 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवामुळे निराश झालेल्या या क्रिकेटवेड्यानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं समजतंय. 

Updated: Mar 27, 2015, 12:46 PM IST
टीम इंडियाच्या पराभवामुळे नैराश्यग्रस्त 'फॅन'ची आत्महत्या title=
प्रातिनिधिक फोटो

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सिंचन विभागाच्या एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केलीय. धक्कादायक म्हणजे, गुरुवारी सिडनीमध्ये वर्ल्डकप 2015 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवामुळे निराश झालेल्या या क्रिकेटवेड्यानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं समजतंय. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंचन विभागाचा कर्मचारी उमेश चंद्र (50 वर्ष) यानं हजरतगंज स्थित एका बहुमजली इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्या केलीय. यामध्ये, उमेशचंद्रचा जागीच मृत्यू झाला.  

मिळालेल्या माहितीनुसार, हुसैनगंज भागात एका भाड्याच्या घरात तो राहत होता. टीम इंडियाच्या झालेल्या पराभवामुळे उमेशनं नैराश्यग्रस्त अवस्थेत आत्महत्येचं पाऊल उचललं. 

पोलिसांनी उमेशचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवलाय. पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.