नवी दिल्ली : औषध अतिरिक्त प्रमाणात घेतल्यानं सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाल्याचा दावा सुनंदा याचे पती आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केलाय.
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी शनिवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीनं शशी थरुर यांची तब्बल पाच तास चौकशी केली. दरम्यान, मृत्यूच्या आदल्या दिवशीच सुनंदा यांचं शशी थरुर यांच्याशी भांडण झालं होतं. त्याबाबतही एसआयटीनं थरुर यांच्याकडे विचारणा केली.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पोलीस या प्रकरणी आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय. १७ जानेवारी २०१४ ला सुनंदा यांचा मृतदेह दिल्लीतल्या पंचतारांकीत हॉटेलमधल्या खोलीत आढळून आला होता. तर सुनंदा यांचा मृत्यू विष घेतल्यामुळे झाल्याचा वैद्यकीय अहवाल एम्सनं दिला होता.