नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं प्रकरण दिवसेंदिवस वेगळं वळण घेताना दिसतंय. सोमवारी, मीडियामध्ये आलेल्या काही दाव्यांनुसार, काँग्रेसचे खासदार शशी थरुर हे यांनी पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार हिच्यासोबत दुबईमध्ये थांबले होते.
सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू गेल्या वर्षी १७ जानेवारी रोजी दक्षिण दिल्लीच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाला होता. मृत्यूअगोदर सुनंदा यांचा सोशल वेबसाईट ट्विटरवर मेहर तरार हिच्यासोबत चांगलाच वाद झाला होता. महत्त्वाचं म्हणेज, याच दरम्यान शशी थरूर आणि मेहर तरार यांचं कथित प्रेमप्रकरणंही चर्चेत आलं होतं.
आता, मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर भारतीय जनता पार्टीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शशी थरूर यांच्यावर निशाणा साधलाय. 'मेहर तरार हिच्यासोबत तीन रात्री घालवल्या तेव्हा शशी थरूर हे तत्कालीन कॅबिनेट मंत्री होते' स्वामी यांनी म्हटलंय. यासाठी, स्वामी यांनी एका न्यूज चॅनलच्या रिपोर्टचा हवालाही दिलाय. यामध्ये, न्यायालयीन चौकशीदरम्यान एका साक्षीदारानं थरुर आणि तरार दुबईत तीन दिवस एकत्र राहिले होते, असा खुलासा केलाय.
When Tharoor allegedly spent three night with suspected ISI compliant journalist Tarar, he was India's Union Minister. That is like Profumo
— Subramanian Swamy (@Swamy39) January 12, 2015
The Police better talk to Tharoor soon before he has a memory loss
— Subramanian Swamy (@Swamy39) January 12, 2015
दरम्यान, सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीला गती मिळताच शशी थरुर रविवारी राजधानी दिल्लीत दाखल झालेत. दिल्ली पोलीस आयुक्तांनी येत्या दोन-तीन दिवसांत पोलिसांच्या चौकशीतील बाबी सार्वजनिक करणार असल्याचं म्हटलंय. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर 'एम्स' हॉस्पीटलच्या मेडिकल रिपोर्टच्या आधारावर भारतीय कलम ३०२ अनुसार हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. सुनंदा यांचा मृत्यू विषामुळे झाला असल्याचंही उघड झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.