एअरफोर्सचे जवान दाढी वाढवू शकत नाहीत - सर्वोच्च न्यायालय

धार्मिक आधारावर दाढी ठेवल्यानं भारतीय सेनेतून सेवामुक्त केलेल्या मकतुम हुसैन याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय. 

Updated: Dec 15, 2016, 12:56 PM IST
एअरफोर्सचे जवान दाढी वाढवू शकत नाहीत - सर्वोच्च न्यायालय  title=

नवी दिल्ली : धार्मिक आधारावर दाढी ठेवल्यानं भारतीय सेनेतून सेवामुक्त केलेल्या मकतुम हुसैन याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय. 

एअरफोर्समध्ये असणारे सैनिक सेवेत असेपर्यंत दाढी वाढवू शकत नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलय. 

ड्युटीवर असताना मकतुमनं दाढी वाढविल्या कारणानं त्याला एअरफोर्समधून काढण्यात आलं होतं. २००१ साली मकतुमनं आपल्या कमांडिंग ऑफिसरकडे (सीओ) धार्मिक कारणावरून दाढी वाढविण्याची परवानगी मागतली होती. सीओंनी सुरुवातीला यासाठी परवानगी दिली पंरतु, नियमांनुसार, केवळ शीख सैनिकांना दाढी वाढविण्याची परवानगी असल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी ही परवानगी नाकारली. 

मकतुमनं हा 'भेदभाव' असल्याचं म्हणत कर्नाटक हायकोर्टच्या नियमांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. 

यानंतरही मकतुमनं दाढी कापण्यास नकार दिल्यानं त्याची बदली पुण्याच्या कमांड हॉस्पीटलमध्ये करण्यात आली. तिथंही मकतुम आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला. यावर त्याला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यानंतरही त्यानं नियम धुडकावल्यानं कारवाई करत सेवेतून हटवण्यात आलं होतं.