अखेर ज्योतिबाच्या सेवेतून ‘सुंदर’ची सुटका!

सुंदर हत्तीला दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं सुंदर हत्तीला जंगलात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं विनय कोरेंची याचिका फेटाळून लावली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 29, 2014, 05:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सुंदर हत्तीला दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं सुंदर हत्तीला जंगलात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं विनय कोरेंची याचिका फेटाळून लावली आहे.
कोर्टानं सुंदरला बंगळुरुरच्या बनरगट्टी जंगलात सोडण्याचे आदेश दिलेत. ज्योतिबाच्या सेवेसाठी विनय कोरे यांनी सुंदर नावाचा हा हत्ती मंदिर व्यवस्थापनाला भेट दिला होता. सुंदर हत्तीची देखभाल व्यवस्थित होत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर कोरे यांनी त्याला वारणानगरला हलवलं होतं.
सात एप्रिलला उच्च न्यायालयाने सुंदर हत्तीला बेंगळुरू येथील वाइल्ड लाइफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर येथे सोडून देण्याचे आदेश दिले आहेत. त्या विरोधात आमदार विनय कोरे यांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती.
सुंदर हत्तीवर होत असलेल्या `अत्याचारा`विरोधात अभिनेत्री सेलिना जेटली आणि पीपल फॉर इथिकल ट्रिटमेंट फॉर अॅनिमल (पेटा) संस्थेचे नरेश कदयान यांनी आमदार विनय कोरे आणि हत्तीच्या माहूताविरोधात स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या.
सुंदरला वाइल्ड लाइफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर येथे सोडून देण्यासाठी `पेटा` २०१२ पासून प्रयत्नशील आहे. ब्रिटनचे संगीतकार पॉल मॅककार्टेनी, हॉलिवूडची अभिनेत्री पामेला अंडरसन, माधुरी दीक्षित, आर. माधवन या सेलिब्रीटीजनी सुंदरला सोडून देण्याची मागणी उचलून धरली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.