मुजफ्फरनगर : अखिल गुप्ता या आसाराम खटल्यातील महत्वाच्या साक्षीदाराची हत्या करण्यात आली आहे. अखिल गुप्ता यांच्यावर मुजफ्फरनगरमधील नवी मंडी परिसरात गोळी घालून हत्या करण्यात आली.
ही आसाराम प्रकरणातील ही तिसरी हत्या असल्याचं सांगितलं जातंय. अखिल गुप्ताचे मारेकरी अद्यापही फरार आहेत, पोलीस पुढील तपास करत आहे.
अखिल गुप्ता हा यापूर्वी आसाराम बापूंचा नोकर होता. सोबतच सुरत येथील बलात्कार प्रकरणी त्याला गुजरात पोलिसांनी अटकही केली होती. आसाराम बापूवरील बलात्काराच्या खटल्यामध्ये त्यानं आसाराम विरोधात साक्ष दिली होती.
त्याबरोबरच त्याचा माफीचा साक्षीदार करुन आसारामांच्या विरोधात सरकारी साक्षीदार केल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळेच अखिल गुप्ता यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.