'नोटबंदीचा सर्व्हे ठरवलेला'

नोटबंदीबाबत नमो अॅपच्या माध्यमातून करण्यात आलेला सर्व्हे हा आधीच ठरवलेला होता

Updated: Nov 24, 2016, 05:38 PM IST
'नोटबंदीचा सर्व्हे ठरवलेला' title=

नवी दिल्ली : नोटबंदीबाबत नमो अॅपच्या माध्यमातून करण्यात आलेला सर्व्हे हा आधीच ठरवलेला होता, असा गंभीर आरोप भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हांनी केला आहे. तसंच नागरिकांचा त्रास लक्षात घ्या आणि मुर्खांच्या नंदनवनात फिरणं बंद करा असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत.

आमच्या माता भगिनींनी भविष्यात कठीण प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी पैशांची बचत केली आहे. या पैशांची तुलना काळ्या पैशांबरोबर करणं चुकीचं आहे, असं ट्विट शत्रुघ्न सिन्हांनी केलं आहे.

पंतप्रधानांनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर विरोधक आणि सत्तेत असलेली शिवसेना आधीपासूनच टीका करत आहे. आता तर भाजपचेच खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा पंतप्रधानांच्या या निर्णयावर बरसले आहेत.