PHOTO : सुषमा स्वराज यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस असा केला साजरा!

सोशल वेबसाईट ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेत्या सुषमा स्वराज यांनी नुकताच आपल्या आठवणींना उजाळा दिलाय... तोही आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं...  

Updated: Jul 14, 2016, 09:31 AM IST
PHOTO : सुषमा स्वराज यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस असा केला साजरा! title=

नवी दिल्ली : सोशल वेबसाईट ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेत्या सुषमा स्वराज यांनी नुकताच आपल्या आठवणींना उजाळा दिलाय... तोही आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं...  

आपल्या लग्नातील एक फोटो शेअर करून ६४ वर्षीय सुषमा स्वराज यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवस सेलिब्रेट केलाय. १३ जुलै रोजी त्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केलाय. 

तसंच शुभेच्छुकांचेही सुषमा स्वराज यांनी आभार मानलेत. सुषमा स्वराज यांनी पोस्ट केलेल्या फोटोत त्यांचे पती स्वराज आणि त्या आपल्या लग्नातील पेहरावात दिसत आहेत. सुषमा यांचे पती स्वराज कौशल हे सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत.

आणखी एका फोटोत सुषमा या पती स्वराज कौशल आणि ज्येष्ठ समाजसुधारक जयप्रकाश नारायण दिसत आहेत. चार दशकांपूर्वीचा हा फोटो आहे. 

तसंच सुषमा यांनी आपला आणखी एक फोटो ट्विट केलाय. २५ वर्षांच्या असताना त्यांनी हरियाणाच्या कामगार व रोजगार मंत्रीपदी शपथ घेतली होती.