सोपोर: जम्मू काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्लानं हादरलंय. सोपोर इथल्या बीएसएनएलच्या शोरूमवर दहशतवादी हल्ला झालाय.
बीएसएनएलचं सीमकार्ड वापरु नये अशी धमकी, या आधी दहशतवाद्यांनी दिली होती. त्याचाच भाग म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचं पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आलंय. दरम्यान या हल्ल्यात तीन जण जखमी झालेत.
हल्ल्याची माहिती कळताच भारतीय जवान घटनास्थळी दाखल झाले असून दहशतवाद्यांचा शोध घेणं सुरू आहे. लष्कर-ए-इस्लामी या दहशतवादी संघटनेनं बीएसएनएलचे सीमकार्ड न वापरण्याची धमकी दिली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.