अक्षरधाम मंदिर बनविणारे स्वामी महाराज यांचे निधन

बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम संस्थानचे (बीएपीएस) प्रमुख स्वामी महाराज यांचे शनिवारी सायंकाळी ६ वाजता गुजरातच्या सारंगपूर येथे निधन झाले. 

Updated: Aug 13, 2016, 10:31 PM IST

अहमदाबाद : बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम संस्थानचे (बीएपीएस) प्रमुख स्वामी महाराज यांचे शनिवारी सायंकाळी ६ वाजता गुजरातच्या सारंगपूर येथे निधन झाले. 

स्वामीनारायण संस्थेचे संस्थापक आणि देश-विदेशात ओळखले जाणारे अक्षरधाम मंदिर त्यांनी उभारले. ते गेले काही दिवस आजारी होते.

स्वामी महाराज यांना गेल्या काही महिन्यांपासून व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. स्वामी नारायण संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची गेल्या आठवड्यापासून तब्बेत बिघडली होते. त्यांचा जन्म ७ डिसेंबर १९२२ रोजी झाला. 

स्वामी महाराज यांनी १८ व्या वर्षी घर सोडले होते. त्यांनी धर्म प्रसाराचा मार्ग स्वीकारला होता. त्यांचे खरे नाव शांतिलाल पटेल आहे. धर्मगुरुमध्ये ते प्रसिद्ध होते. स्वामी महाराज यांनी जगात ६३१ मंदिरे उभारलीत.