लव्ह जिहाद: भयंकर! रकीबुल अधिकाऱ्यांना पुरवायचा मुली

लव्ह जिहाद प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या चौकशी रणजीत कोहली उर्फ रकीबुलनं एक धक्कादायक माहिती दिलीय. रकीबुल सरकारी अधिकाऱ्यांना आणि न्यायव्यवस्थेतील अनेक लोकांना मुली पुरवायचा.  

Updated: Aug 30, 2014, 12:30 PM IST
लव्ह जिहाद: भयंकर! रकीबुल अधिकाऱ्यांना पुरवायचा मुली title=

रांची: लव्ह जिहाद प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या चौकशी रणजीत कोहली उर्फ रकीबुलनं एक धक्कादायक माहिती दिलीय. रकीबुल सरकारी अधिकाऱ्यांना आणि न्यायव्यवस्थेतील अनेक लोकांना मुली पुरवायचा.  

चौकशीत रणजीत उर्फ रकीबुलनं सांगितलं की, मागील अनेक काळापासून तो देह व्यापारामध्ये गुंतलाय आणि सरकारी अधिकाऱ्यांनो तो मुली पुरवायचाय रणजीतनं पोलिसांना अशा 36 अधिकाऱ्यांची नावं सांगितलीत ज्यांना त्यानं मुली पुरवल्या. या खुलाशामुळं हे प्रकरण हाय प्रोफाईल असल्याचं समोर येतंय. रणजीतनं दिलेल्या माहितीनुसार आता पुढं चौकशी सुरू आहे. रणजीत 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत असून रांची पोलीस चौकशी करत आहे. 

काही दिवसांपूर्वी रांचीतील नॅशनल शूटर तारा सहदेवनं आपला नवरा रणजीत उर्फ रकीबुलवर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकत असल्याचा आणि मारहाण करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर रणजीत फरार होता. त्याला रांची आणि दिल्ली पोलिसांनी मिळून अटक केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.