'डी फॉर दारू' आणि 'पी फॉर पिओ'

छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका प्राथमिक शाळेतील एक शिक्षण मद्यधूंद अवस्थेत शिकवतोय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, दारूच्या नशेत हा शिक्षक विद्यार्थ्यांना 'डी फॉर दारू' आणि 'पी फॉर पिओ' असं शिकवत असल्याचं व्हिडीओत कैद झालं आहे.

Updated: Jul 12, 2015, 05:13 PM IST
'डी फॉर दारू' आणि 'पी फॉर पिओ'  title=

कोरिया : छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका प्राथमिक शाळेतील एक शिक्षण मद्यधूंद अवस्थेत शिकवतोय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, दारूच्या नशेत हा शिक्षक विद्यार्थ्यांना 'डी फॉर दारू' आणि 'पी फॉर पिओ' असं शिकवत असल्याचं व्हिडीओत कैद झालं आहे.

प्राथमिक शाळेतील शिक्षक शिवबरन विद्यार्थ्यांना मद्यधूंद अवस्थेत दारु पिण्याचे धडे देत असल्याचे या व्हिडीओत दिसतंय. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने या घटनेची दखल घेत शिवबरन यांच्याविरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

हा व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यावर शिवबरन यांनी माफी मागून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पुन्हा मद्यधूंद अवस्थेत शाळेत जाणार नाही असेही शिवबरन यांनी सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.