www.24taas.com, वृत्तसंस्था, हैदराबाद
स्वतंत्र राज्य तेलंगण निर्मितीला मंजुरी मिळाल्यानंतर आंध्रमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. जाळपोळ यासारख्या घटनानंतर आता वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विजयनगरसह अनेक भाग अंधारात बुडाले आहेत. दरम्यान, तेलंगणविरोधकांच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे.
आंध्रची किनारपट्टी आणि रायलसीमा भागांत तेलंगणविरोधकांच्या आंदोलनाची धग कायम आहे. तर विजयनगरमध्ये बेमुदत संचारबंदी असूनही तणाव आहे. तेलुगू देसमचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी नवी दिल्लीत बेमुदत उपोषणाला प्रारंभ केलाय.
स्वतंत्र तेलंगणच्या निर्मितीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन ऑक्टोअबरला मंजुरी दिल्यानंतर तेलंगणविरोधी हिंसक आंदोलनाचे केंद्र बनलेल्या विजयनगरमध्ये संचारबंदी कायम आहे. हिंसाचारासंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत ३४ जणांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी काहींच्या अटकेची शक्यबता आहे. कन्यकापरमेश्व री मंदिर, कोठपेठ, दासनपेठ, गाजुलारेगा आदी भागांत पोलीस आणि निमलष्करी दलांची गस्त सुरू आहे.
आंदोलनात वीज कर्मचारीही सहभागी झाल्यामुळे हैदराबादसह सीमांध्रातील अनेक गावे, शहरांना फटका बसला आहे. वीज नसल्यामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. राज्याची औष्णिक वीजनिर्मिती क्षमता ६०९० मेगावॉट असताना जेमतेम २२९० मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे. त्यामुळे राज्य अंधारात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.