चेन्नई : मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला प्रसाद म्हणून साखरफुटाणे, लाडू अथवा पेढे तत्सम पदार्थ मिळतात. मात्र दक्षिणेकडील या मंदिरात प्रसाद म्हणून चक्क पिझ्झा, बर्गर, ब्राऊनीज सारखे पदार्थ दिले जातायत. तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना?
चेन्नईच्या पडप्पाई येथील जय दुर्गा पीठात भक्तांना चक्क प्रसाद म्हणून बर्गर, ब्राऊनीज, क्रॅकर, सँडविचेस, चेरी टोमॅटो सॅलड असे पदार्थ दिले जातायत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हर्बल ऑनकोलॉजिस्ट के श्रीधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यासाठी चांगला आणि स्वच्छ ठिकाणी तयार केलेला कोणताही पदार्थ देवाला प्रसाद म्हणून चढवला जाऊ शकतो. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला.
या नव्या कल्पनेमुळे मोठ्या प्रमाणात परेदशी भाविकही या मंदिराला भेट देतात. मंदिरातील हा बदल पाहता देवही मॉडर्न होतायत असंच म्हणावं लागेल.