मुस्लिम तरुणासोबत हिंदू तरुणी पळाली, दादरीमध्ये पुन्हा तणाव

उत्तर प्रदेशातील दादरी परिसरात हिंदू तरुणी मुस्लिम युवकासह पळून गेल्याने या भागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण पसरले आहे.

Updated: Nov 19, 2015, 09:47 AM IST
मुस्लिम तरुणासोबत हिंदू तरुणी पळाली, दादरीमध्ये पुन्हा तणाव title=

नोएडा : उत्तर प्रदेशातील दादरी परिसरात हिंदू तरुणी मुस्लिम युवकासह पळून गेल्याने या भागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण पसरले आहे.

काही आठवड्यांपूर्वीच गोमांस खाल्याच्या संशयावरुन मोहम्मद अखलाक या व्यक्तीला एका समुदायाने जोरदार मारहाण केली होती. या मारहाणीत मोहम्मदचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेने पुन्हा दादरीमध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

तरुणीच्या कुटुंबियांनी मुस्लिम तरुणाविरोधात अपहरण केल्याची तक्रार दाखल केलीय. भारतीय दंड विधानानुसार कलम ३६३ आणि ३६६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे डीएसपी अनुराग सिंग यांनी सांगितले. तरुणी आणि युवकाचा शोध सुरु आहे. त्या तरुणीचा विवाह ठरला होता. मात्र लग्नाच्या एक दिवस आधीच ही तरुणी मुस्लिम युवकासह पळून गेल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.