बदलत्या हवामानाचा आरोग्याला धोका : रिपोर्ट

एका नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानुसार सतत वाढत जाणाऱ्या प्रदुषणामुळे हवामानात होणाऱ्या बदलाचे परिणाम जाणवू लागले आहेत. या बदलांचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होण्याचा इशारा देण्यात आलाय.

PTI | Updated: Jun 25, 2015, 07:19 PM IST
बदलत्या हवामानाचा आरोग्याला धोका : रिपोर्ट title=

कोच्ची : एका नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानुसार सतत वाढत जाणाऱ्या प्रदुषणामुळे हवामानात होणाऱ्या बदलाचे परिणाम जाणवू लागले आहेत. या बदलांचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होण्याचा इशारा देण्यात आलाय.

प्रदुषणामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहे. हा आपल्यासाठी धोका आहे. भविष्यात लोकांवर विघातक परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. लान्सेट कमिशन ऑन हेल्थ अॅण्ड क्लायमेट चेंज यांच्या २०१५च्या अहवालात म्हटलयं, हवामानात होणाऱ्या बदलांमुळेच जगात सर्वत्रच दुष्काळ, अतिवृष्टी, त्सुनामी, वादळ यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

तसेच या बदलांचा परिणाम हा साथीच्या रोगांमध्ये वाढ, वायू प्रदुषणात वाढ, कुपोषणदेखील अप्रत्यक्षरित्या होते. त्यामुळे हवामानातील बदल आणि लोकामंधून आलेल्या सूचना याचा अभ्यास करण्यासाठी २०१५मध्ये लान्सेट कमीशन ऑन हेल्थ अॅण्ड क्लाइमेट चेंज या आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे जगभरातील समस्या दूर करण्यासाठी आणि आरोग्याचे निदान तसेच मानक ठरविण्यासाठी याची मदत घेतली जाणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.