'पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्या पाठिशी राहा'

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे या दोन्ही मंत्र्यांच्या मागे पक्षानं खंबीरपणे उभे राहावं, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Updated: Jun 25, 2015, 06:48 PM IST
'पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्या पाठिशी राहा' title=

नवी दिल्ली : महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे या दोन्ही मंत्र्यांच्या मागे पक्षानं खंबीरपणे उभे राहावं, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी पुढल्या महिन्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला होणाऱ्या कुंभमेळ्याला येण्याचं आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी दिले.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत राज्यमंत्री रणजीत पाटील आणि गिरीष महाजन उपस्थित होते. यावेळी मोदी आणि फडणवीस यांच्यात १५ मिनिटं चर्चाही झाली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत ही चर्चा झाल्याचं समजतंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.