नवी दिल्ली : ट्रिपल तलाकवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुस्लिम पर्सनल लॉमधली कालबाह्य तरतुदींवरही युक्तीवाद होणार आहे. हे प्रकरण कोर्टात नव्हे मौलवींवर सोपवा,अशी मागणी होत आहे. दरम्यान, उलेमांच्या संघटनेची फूटीनंतर ही मागणी होत आहे.
सर्वोच्च न्यायालयातील संवैधानिक खंडपीठ आजपासून रोज सुनावणी करणार आहे. कोर्टात निकाह हलाला आणि बहूविवाहावरही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जगदीश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय खंडपीठ याचिकेवर सुनावणी करणार आहे.
संविधान खंडपीठात सिख, ईसाई, पारसी, हिंदी आणि मुस्लिम समुदायाच्या सदस्यांचा समावेश आहे. सात याचिकांपैकी पाच याचिक मुस्लिम महिलांनी दाखल केल्यात. या याचिकेत तीन तलाकच्या प्रथेला आव्हान देण्यात आलंय.