नवी दिल्ली : फटाके फोडण्यास बंदीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली आहे. केंद्र सरकारनं उत्तर द्यावं, अशी सुप्रिम कोर्टाची नोटीस बजावलीये.
तीन लहान मुलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. फटाक्यामुळे आरोग्य धोक्यात येते. स्वच्छ वातावरणात जगण्याचा अधिकार यामुळं हिरावून घेतला जातो. असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. आता केंद्राच्या भूमिकेकडे लक्ष आहे.
फटाक्यांमुळं दरवर्षी शेकडो मुले जखमी होतात. काही ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडतात. तर कुठे अपघातात काहींचा बळीही जातोय. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे वृद्ध नागरिक आणि रुग्णांनाही खूप त्रास होत असतो. याविषयी जनजागृतीही होत असते. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी 'झी २४ तास'ही दरवर्षी पुढाकार घेते. त्याला शालेय विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद मिळत असतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.