Video : न्याय मागणाऱ्या महिलेला पोलिसांनी विर्वस्त्र करुन केली मारहाण

ग्रेटर नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली. न्याय मागणाऱ्याच महिलेला पोलिसांनी विर्वस्त्र करुन मारहाण केली. पीडित कुटुंब लुटीच्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दिला. दरम्यान, महिला पोलीस नसताना संपूर्ण कुटुंबाला विवस्त्र केले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

Updated: Oct 8, 2015, 09:54 PM IST
Video : न्याय मागणाऱ्या महिलेला पोलिसांनी विर्वस्त्र करुन केली मारहाण title=

लखनऊ : ग्रेटर नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली. न्याय मागणाऱ्याच महिलेला पोलिसांनी विर्वस्त्र करुन मारहाण केली. पीडित कुटुंब लुटीच्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दिला. दरम्यान, महिला पोलीस नसताना संपूर्ण कुटुंबाला विवस्त्र केले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी, रस्त्यावर अश्लील हावभाव केल्याप्रकरणी आणि पिस्तोल चोर केल्याचा रिपोर्ट दाखल करत सर्वांना तुरुंगात पाठविले. कोतवाली प्रभारी प्रविण यादव यांचे म्हणणे आहे की, माझे पिस्तोल घेऊन पळण्याचा प्रयत्न केला गेला. तीन महिलांसह पाच जण स्वत: विर्वस्त्र होऊन प्रदर्शन करीत होते. सार्वजनिक ठिकाणी अश्लील प्रदर्शन करण्याची कोणाला मुभा नाही. त्यामुळे या सर्वांना अटक केली.

दनकौर भागात अट्टा गुजरान निवासी सुनील गौतम यांनी आरोप केलाय, त्याच्या भावाला लूटले. याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता पोलिसांनी रोखले. त्यानंतर कुटुंबाने धरणे आंदोलन केले. यावेळी महिलांनी विवस्त्र होऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

व्हिडिओ पाहा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.