व्यंकय्या नायडूंच्या ट्वीटर अकाऊंटवर असाही गोंधळ

आजकाल मंत्र्यांमध्ये ट्विटर शुभेच्छा किंवा दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली असते, अशाच घाईगडबडीत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 9, 2017, 11:41 AM IST
व्यंकय्या नायडूंच्या ट्वीटर अकाऊंटवर असाही गोंधळ

नवी दिल्ली :  आजकाल मंत्र्यांमध्ये ट्विटर शुभेच्छा किंवा दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली असते, अशाच घाईगडबडीत. 

माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडूंच्या ट्वीटर अकाऊंट हँडल करणाऱ्या टीमनं एक मोठा घोळ घातला आहे. आज ज्येष्ठ समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखलेंची आज जयंती, या निमित्तानं नायडूंच्या ट्विटर हँडलवर त्यांना आदरांजली वाहण्याचा ट्वीट करण्यात आला.

पण त्याला फोटो लोकमान्य टिळकांचा, मग काय ट्विटरवर जोरदार ट्रोलिंग सुरू झालं. माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडूंच्या टीमला तोंड कुठे लपवावं, सूचेना. शेवटी नायडूंनी आपलं ट्विट डिलीट केलं, पण त्याआधी जो काय गोंधळ व्हायचा तो होऊन गेला.