ही कार चालणार एका लीटरमध्ये २०० किलोमीटर

 रेवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी एक अशी कन्सेप्ट कार डेव्हलप केली आहे, ती जर प्रत्यक्षात अवतरली तर ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वात मोठा बदल होईल. 

Updated: Oct 12, 2016, 08:30 PM IST
ही कार चालणार एका लीटरमध्ये २०० किलोमीटर  title=

बंगळुरू :  रेवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी एक अशी कन्सेप्ट कार डेव्हलप केली आहे, ती जर प्रत्यक्षात अवतरली तर ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वात मोठा बदल होईल. 

मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ही अर्बन कन्सेप्ट कार बनवली आहे ती एक लीटर पेट्रोलमध्ये २०० ते २५० किलोमीटरचे अंतर पार करू शकेल. विद्यार्थ्यांनी या अर्बन कन्सेप्ट कारचे ९० टक्के डिझाइन पूर्ण केले आहे. 

सिंगापूरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या 'शेल इको मॅरथॉन' मध्ये ही कन्सेप्ट कार' प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रोफेसर शहनवाज पाटील आणि प्रोफेसर मोहम्मद इरफान यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट केला आहे. यात पश्चिम बंगालचे पाच, उत्तर प्रदेशचे दोन आणि एक झारखंड आणि बांगलादेशातील आहे.  मुजकिर शरीफ, मोहम्मद इरफान, एस. के. मेहबूब मुर्शीद, मोहम्मद आतिफ, तोयोद हालदार, सुजीत राणा, नीतेश के. आर. प्रजापति. मयुख तालुकदार, एस. के. मुस्तफा आणि रेबु नासकार अशी या मुलांची नावे आहेत. 

कशी असेल ही कार...
या कारमध्ये दोन सीट असणार आहेत. विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेले याचे इंजिन खूप कमी इंधन घेते. त्यामुळे ते फायदेशीर असणार आहे. 

सामान्य कारपेक्षा ही कार वेगळी असणार आहे. त्याचे इंजिन वेगळे असणार आहे. याचे सिलेंडर आणि डेड आवश्यकतेनुसार बनविण्यात आले आहे. एक्झॉट पाइप असा तयार केला आहे की त्यामुळे गाडीला जास्तीजास्त ताकद दिली जाईल. गाडीला हलके बनविण्यात आले आहे त्यामुळे मायलेज अधिक असणार आहे.