विमान प्रवासात मिळणार फक्त तीन पेग दारू

एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रिमियम इंटरनॅशनल प्रवाशांना फक्त तीन पेग दारू मिळणार आहे.

Updated: Dec 5, 2016, 07:00 PM IST
विमान प्रवासात मिळणार फक्त तीन पेग दारू title=

मुंबई : एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रिमियम इंटरनॅशनल प्रवाशांना फक्त तीन पेग दारू मिळणार आहे. दारू पिऊन विमानामध्ये गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

डीडीसीएच्या नियमानुसार दिल्ली विमानतळावरच्या बिजनेस क्लास आणि फर्स्ट क्लास प्रवाशांना आता व्होडका, व्हिस्की, रम यांचे तीन पेग आणि वाईनचे दोन ग्लास देण्यात येतील.