आजची रात्र ही सगळ्यात मोठी रात्र

२२ डिसेंबर ह्या दिवशी जगातली सर्वात मोठी रात्र असते. तर आजचा दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. याच दिवशी समुद्रावर सूर्यास्त पाहण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी पाहायला मिळते. रात्रीही गुलाबी थंडीची मजा घेत फेरफटका मारण्याचे बेत अनेकांनी आखले आहेत. 

Updated: Dec 22, 2014, 08:13 PM IST
आजची रात्र ही सगळ्यात मोठी रात्र title=

मुंबई : २२ डिसेंबर ह्या दिवशी जगातली सर्वात मोठी रात्र असते. तर आजचा दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. याच दिवशी समुद्रावर सूर्यास्त पाहण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी पाहायला मिळते. रात्रीही गुलाबी थंडीची मजा घेत फेरफटका मारण्याचे बेत अनेकांनी आखले आहेत. 

ग्रेगरी दिनदर्शिकेत २१ डिसेंबर हा वर्षातील ३५५वा किंवा लीप वर्षात ३५६वा दिवस असतो. हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते. हिंदू संस्कृतीमध्ये ह्या आजच्या दिवसाचे फार महत्व आहे.

आजपासून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. आजच्या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे.  

पौराणीक कथेनुसार आजच्या दिवशी महाभारतातील भीष्मपितामह त्यांनी आपला शरपंजर देह सोडला. त्यांना इच्छा मरण प्राप्त होते. या दिवशी सर्व पित्र उत्तर दिशेला स्थलांतर करतात म्हणूनच या दिवसाला 'पित्रायण' असे देखील म्हणतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.