दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये रविवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता सहा रिश्टर स्केल इतकी होती.

Updated: Nov 23, 2015, 10:26 AM IST
दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के title=

नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये रविवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता सहा रिश्टर स्केल इतकी होती.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान विभागाच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील हिंदुकुश क्षेत्रात होते. हा भाग अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमेजवळ आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, हरियाणा या राज्यांमध्ये हादरे जाणवले.

दरम्यान, या भूकंपामुळे कोणतीही जिवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. तसेच पाकिस्तानच्या इस्लामाबाद, लाहोर आणि पेशावर त्याचबरोबर अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.