तंगधारमध्ये सीमेपलीकडून गोळीबार, २ जवान शहीद

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन भारतीय सैनिक शहीद झाले आहेत, यात दोन सैनिक गंभीर जखमी झाले असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

Updated: Jan 3, 2015, 09:58 PM IST
तंगधारमध्ये सीमेपलीकडून गोळीबार, २ जवान शहीद title=

तंगधार : पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन भारतीय सैनिक शहीद झाले आहेत, यात दोन सैनिक गंभीर जखमी झाले असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

सीमेवरील गोळीबारात सांबा सेक्टरमध्ये एका महिलेचा देखिल मृत्यू झाला आहे.

या आधी पाकिस्तानी सैनिकांनी कठुआ आणि सांबा जिल्ह्यातील सीमेला रात्री जोरदार गोळीबार केला होता, यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर एक नागरीक गंभीर जखमी होता.

पाकिस्तानी सैनिकांकडून रात्री तीन वाजता तसेच सकाळी सात वाजता गोळीबार करण्यात आल्याचं काही आर्मी ऑफिसर्सनी सांगितलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.