गुवाहाटी : एकाने लिंग कापून मैत्रिणींच्या मदतीने त्याचा मृतदेह जाळल्याची घटना उघड झाली आहे. एका महिलेसह तिच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची ही अवस्था करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कृष्णा भूमीज असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णाने ४ एप्रिल रोजी रितासह तिच्या मुलीवर त्यांच्या घरात बलात्काराचा प्रयत्न केला. यावेळी रिताने त्याचे लिंग कापले.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कृष्णाचे काही वेळात निधन झाले. या घटनेनंतर रिताने सात मैत्रिणींना बोलावून घेतले. घराजवळ त्यांनी त्याचा मृतदेह जाळून टाकला. रिताला अटक करण्यात आली असून, याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कृष्णा भूमीज गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर पूर्वी २ गुन्हे दाखल होते. दरम्यान, कृष्णाच्या नातेवाइकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.