अरुण जेटलींच्या पोतडीमध्ये काय?

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आज आपला दुसरा संपूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद असेल, असं मानलं जातंय. त्याप्रमाणेच सर्वसामान्य नोकरदारांना कर सवलतीच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो.

Updated: Feb 29, 2016, 10:23 AM IST
अरुण जेटलींच्या पोतडीमध्ये काय? title=

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आज आपला दुसरा संपूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद असेल, असं मानलं जातंय. त्याप्रमाणेच सर्वसामान्य नोकरदारांना कर सवलतीच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो.

आर्थिक सर्वेक्षण अहवालात कमी वित्तीय तूट आणि आश्वासक विकास दराचं स्वप्न सरकारनं दाखवलंय. हा अर्थसंकल्प याचीच पुढली पायरी असू शकेल, असं मानलं जातंय. जेटलींच्या पोतडीमध्ये काय आहे, हे येत्या काही तासांत स्पष्ट होईल.

अर्थमंत्री अरूण जेटली आज आपला तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सर्वाधीक भर कृषी आणि ग्रामीण विकासावर देण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राला रूळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरूनच या अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. 

जेटलींच्या या अर्थसंकल्पातून आर्थिक सुधारणांच्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात व्हावी, अशी साऱ्या जगाची अपेक्षा आहे. कारण उदारीकरणाच्या या प्रक्रियेत पंचवीस वर्षांचं पहिलं पर्व आता संपलंय. आता दुसऱ्या पर्वाच्या बरोबर २५ वर्षांपूर्वीचीच किनार आहे. डॉ. मनमोहन सिंहांनी १९९१ मध्ये अर्थसंकल्प सादर करून भारतीय अर्थव्यवस्थेला नवी कलाटणी दिली. उदारीकराणाच्या धोरणाचा पाया रचला. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिहांनी रोवलेल्या रोपट्याचा महाकाय वृक्ष झालाय.

 

अर्थव्यवस्थेचा विकास होतो म्हणजे नेमकं काय होतं, असा जर प्रश्न विचारला, तर  उत्तरं अनेक मिळतील. पण सगळ्या सोपं उत्तर हे, की अर्थव्यवस्थेत्या प्रत्येकाच्या जीवनात. राहणीमानात अमूलाग्र बदल होतो. गेल्या २५ वर्षात नेमकं हेच झालंय. तर दुसरीकडे सुरेश प्रभू यांनी मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पांला जनतेनं पावती दिली. 

अर्थसंकल्पसाठी टीमवर्क...

आता वेळ आहे अरूण जेटलींची. जेटली लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषण देणार असले तरी यामागे शेकडो लोकांची वर्षभराची मेहनत असते. बजेटमधल्या लहानात लहान गोष्टीचा विचार करण्यासाठी अर्थमंत्री हुशार अधिकारी आणि तज्ज्ञांची निवड करतात. हा अर्थसंकल्पही त्याला अपवाद नाही. ही टीम कशी आहे, त्यात कोणकोण आहेत याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

टीम जेटलीचे पहिले सदस्य अर्थातच मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आहेत. अर्थसंकल्प बनवणाऱ्या टीमचे ते प्रमुखही आहेत. आर्थिक सुधारणा राबवण्यासाठी आग्रही असलेल्या सुब्रमण्यम यांनी IIM अहमदाबादमध्ये व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे. त्यांनी जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट केली आहे. IIM, हॉर्वर्ड विद्यापीठात विद्यादानाचं कामही सुब्रमण्यम यांनी केलंय. फॉरेन पॉलिसी मॅगझिननं २०११मध्ये हंड्रेड ग्लोबल थिंकर्समध्ये त्यांचा समावेश केला होता.  

जेटलींच्या टीममधलं आणखी महत्त्वाचं नाव म्हणजे वित्त सचिव रतन वाटल. ते १९७८च्या बॅचचे आंध्र प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत. आर्थिक उदारीकरणाचे जनक माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी काम केलंय. 

१९९१ मधल्या आर्थिक सुधारणा त्यांनी जवळून बघितल्यात. मात्र, डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडीचरच्या नजरेतून पाहत असताना सुब्रमण्यम यांच्या  सुधारणावादी धोरणांना ते किती पाठिंबा देतात, त्यावर अर्थसंकल्पाचं उदारीकरण अवलंबून असेल. त्यांना सातवा वेतन आयोग, OROPमुळे सैनिकांच्या पेंशनचा वाढलेला बोजा, कॅपिटल स्पेंडींग आणि सेवा क्षेत्रासाठीच्या निधीची व्यवस्था करायची आहे.