डेडबॉडी चढईबो! काय आहे गंगेत सापडलेल्या मृतदेहांचं रहस्य...

उन्नावमध्ये गंगेच्या परियार घाटाजवळ सापडलेल्या १०४ मृतदेहांचं गूढ वाढत चाललंय. मात्र, या प्रकरणी आता एक धक्कादायक बाब उघड झालीय. हे मृतदेह गंगा नदीकिनाऱ्यावरच जाळण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

Updated: Jan 15, 2015, 09:26 AM IST
डेडबॉडी चढईबो! काय आहे गंगेत सापडलेल्या मृतदेहांचं रहस्य... title=

उन्नाव, उत्तरप्रदेश : उन्नावमध्ये गंगेच्या परियार घाटाजवळ सापडलेल्या १०४ मृतदेहांचं गूढ वाढत चाललंय. मात्र, या प्रकरणी आता एक धक्कादायक बाब उघड झालीय. हे मृतदेह गंगा नदीकिनाऱ्यावरच जाळण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

गंगेच्या प्रवाहात लहान मुलांचे आणि कुमारिकांचे मृतदेह सोडण्याची एक विचित्र आणि भीषण प्रथा या घटनेमुळे उघड झालीय. परियार घाट परिसरातल्या स्मशानभूमीत दररोज पाच ते दहा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येतात. त्यातील कुमार आणि कुमारिकांचे मृतदेह दहन न करता तसेच गंगेच्या कालव्यात सोडून देण्याची भयंकर प्रथा वर्षानुवर्षं चालत आलीय. त्यापैकीच १०४ मृतदेह बुधवारी परियर घाटाजवळ दिसले.

आतापर्यंत काय काय घडलं....
* बुधवारी उन्नावमध्ये गंगेच्या परियार घाटाजवळ १०४ मृतदेह आढळले
* मृतदेह बाहेर काढण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार
* 'नदीलगतच्या परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य
* मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं पोस्टमार्टम करणं अवघड...  आरोग्य विभागाचं म्हणणं
* बुधवारी रात्री जेसीबीच्या मदतीने मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार
* अंत्यसंस्कार सुरु असताना गंगा प्रदूषण मुक्ती अभियानाचे निमंत्रक पोहचले
* पोलिसांकडे पोस्टमार्टमची मागणी, मागणीकडे गांभीर्याने लक्ष नाही
* निमंत्रकांचे वेगळ्याच मागणीसाठी धरणं आंदोलन 
* संक्रांतीला गंगा स्नानाची प्रथा असल्याने मृतदेह हटवण्याची मागणी
* सापडलेले सगळे मृतदेह नदीच्या किनाऱ्यावर जाळण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट

या प्रकारामुळे गंगा शुद्धीकरण मोहिमेला अनिष्ट परंपरेचा खोडा बसलाय. याबाबत पोलीस आणि अधिकारी मात्र थातुरमातूर उत्तर देण्यात समाधान मानत असल्याचं समोर येतंय. गंगा शुद्धिकरणात, स्वच्छता अभियानात सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या आणि मृतदेह पाण्यात सोडण्याच्या या प्रथेवर कुणीच काही बोलायला तयार नाही. त्यामुळं पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी आणि उमा भारती गंगेच्या या प्रदूषणाबाबत काय भूमिका घेणार असा सवाल उपस्थित होतोय... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.