प्रवाशाला मेलबर्न ते दिल्लीपर्यंत सीटला बांधून ठेवलं

एअर इंडियाच्या विमानात दारू पिऊन, एका प्रवाशानं गोंधळ घातला. या प्रवाशाने एवढा उच्छाद मांडला की, या मद्यधुंद प्रवाशाला सीटला बांधून, मेलबर्न ते दिल्लीचा प्रवास पूर्ण करावा लागला.

Updated: Aug 31, 2014, 10:27 AM IST
प्रवाशाला मेलबर्न ते दिल्लीपर्यंत सीटला बांधून ठेवलं title=

दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात दारू पिऊन, एका प्रवाशानं गोंधळ घातला. या प्रवाशाने एवढा उच्छाद मांडला की, या मद्यधुंद प्रवाशाला सीटला बांधून, मेलबर्न ते दिल्लीचा प्रवास पूर्ण करावा लागला.

याआधी या प्रवाशानं सहप्रवाशाचा चावा घेतला, विमानातील क्रू मेंबरला श्रीमुखात लगावली, यामुळे प्रवाशाला बांधून प्रवास करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला.

या प्रवाशाच्या गोंधळामुळे विमान सिंगापूरकडे नेण्याचा विचार सुरू होता, मात्र यालाही प्रवाशाला कडाडून विरोध केला. अखेर या प्रवाशाला बांधून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. 

या किस्सा 20 ऑगस्ट रोजी घडला तो आज समोर आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.