सहारनपूर : उत्तरप्रेदशातील सहारनपूर एक वेगळचं प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलाने एका तरूणीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या किशोरवयीन मुलाच्या तक्रारीनंतर तरूणीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सहारनपूर पोलीसांनी कोर्टाचा आदेशाचे पालन करत २३ वर्षीय तरूणीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. १६ वर्षाचा मुलाचा आरोप आहे की ही तरूणी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती.
तरूणीकडे या किशोरवयीन मुलासोबत सेक्स केल्याचे व्हिडिओ होते. त्याची भीती दाखवून ती त्याचा लैंगिक छळ करत होती.
ही तरूणी व्हिडिओ ऑनलाइन करण्याची धमकी देत होती आणि लग्नाचा दबाव टाकत होतील. सुरूवातीला पोलिसांना हे प्रेमप्रकरण वाटत होतं. पण त्यानंतर पोलिसांनी मेसेज आणि कॉल रेकॉर्डिंग तपासले. त्यानंतर लक्षात आले की तरूणी लग्नासाठी दबाव टाकत होती. आता पोलिस तो व्हिडिओ शोधत आहे ज्यात किशोरवयीन मुलगा त्या तरूणीसोबत आपत्तीजनक अवस्थेत आहे.