www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारनं राहुल गांधींच्या आणखी एका प्रस्तावाला मंजुरी दिलीय.. सरकारनं जैन समाजाला अल्पसंख्यांकाचा दर्जा दिलाय.
जैन समाजाच्या प्रतिनिधींनी रविवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधींनी या प्रतिनिधींचं म्हणणं पंतप्रधानांपर्यंत पोहचवलं. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी समाजानंतर आता जैन समाजालाही ५० लाखांचा अल्पसंख्याकांचा दर्जा मिळालाय. त्यामुळं जैन समाजालाही यापुढे सरकारी योजनांचा फायदा मिळणार आहे.
जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालाय. नेमके या निर्णयाचे लाभ काय आहे पाहूयात...
* अनुच्छेद २९, ३० अन्वये काही मुलभूत हक्क मिळणार
* शिक्षणसंस्था स्थापून त्याचं स्वत: नियमन करणे
* स्थापित संस्थांत ५० टक्के जागा आरक्षित ठेवण्याची मुभा
* सरकारी शिष्यवृत्त्या, योजनांचा लाभ मिळणार
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.