www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत ४ पोलिसांचे निलंबन किंवा बदली तरी करावी म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांचे धरणे आंदोलन आज दुस-या दिवशीही सुरु आहे.
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शांतपणे झोपू देणार नसल्याचं सांगत कुठल्याही वाटाघाटींशिवाय आंदोलन सुरुच राहिल असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान आजही रेल भवनकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. तर या भागाच्या जवळची ४ मेट्रो स्टेशन्स आजही सकाळपासूनच बंद आहेत.
काल दिल्ली पूर्ण ठप्प होती. आजही सकाळपासून दिल्लीकरांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. दिल्लीतील पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी आग्रही असलेल्या आम आदमी पक्षाचं धरणे आंदोलन रात्रभर सुरुच होते. गृहमंत्री शिंदे यांनी केजरीवाल यांना आंदोलन जंतर मंतर येथे करण्यास सांगितले होते. केजरीवाल यांनी आपले मंत्री व समर्थकांसह रात्र ही रस्त्यावरच काढली.
केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांना कामावर न जाता आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीत कडाक्याची थंडी असूनही, रेल भवनजवळ रस्त्यावरच केजरीवाल यांनी निवारा घेतला. या आंदोलनामुळे दिल्लीचे दोन मेट्रो स्टेशन आजही बंद ठेवण्यात आली आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ