बंगळुरू : भाजप आमदारांनी प्रियंका गांधी यांचा फोटो झूम करून पाहिल्याच्या प्रकरणावर गोंधळ झाल्यानंतर कर्नाटक विधानसभेची कार्यवाही स्थगित करावी लागली. विधानसभेची कार्यवाही सुरू झाल्यावर काँग्रेसच्या आमदारांनी स्पीकरच्या बाकांसमोर जोरदार गोंधळ सुरू केला. ते सर्व भाजप आमदार प्रभू चव्हाण यांच्या बुधवारच्या कारनाम्यावर त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करीत होते.
चव्हाण यांची वर्तणूक माफीच्या लायक नाही, भाजप आमदाराच्या अशा वागण्याने आमच्या नेत्यांच्या अपमान झाला आहे, असे काँग्रेसच्या आमदारांनी सांगितले. दरम्यान, भाजपच्या आमदाराने आपल्या या वागणुकीबद्दल डोळ्यात अश्रू आणून चूक झाल्याचे कबूल केले. पण त्यांचे म्हणणे कोणी ऐकून घेतले नाही.
कर्नाटक विधानसभेत उसाच्या दरावर गंभीर चर्चा सुरू असताना टीव्ही फूटेजमध्ये दिसले की चव्हाण आपल्या फोनवर प्रियंका गांधी यांचा फोटो पाहत होते आणि दुसरे आमदार यू. बी. बानकर विधानसभेत मोबाईलवर कँडी क्रश सागा खेळत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.