यूपीएससी : अखेर इंग्रजी भाषा आकलनाचा भाग वगळला

यूपीएससी पूर्व परीक्षेमधून इंग्रजी भाषा आकलनाचा भाग वगळण्याच्या निर्णयावर आयोगाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय. पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी भाषा आकलनाचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवू नयेत. 

Updated: Aug 17, 2014, 04:39 PM IST
यूपीएससी : अखेर इंग्रजी भाषा आकलनाचा भाग वगळला title=

नवी दिल्ली : यूपीएससी पूर्व परीक्षेमधून इंग्रजी भाषा आकलनाचा भाग वगळण्याच्या निर्णयावर आयोगाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय. पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी भाषा आकलनाचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवू नयेत. 

या प्रश्नांचे मूल्यमापन करण्यात येणार नाही, असं आवाहन उमेदवारांना आयोगानं केलाय. यूपीएससीच्या पूर्व परीक्षेबाबत झालेल्या वादानंतर पूर्व परीक्षेत इंग्रजी भाजा आकलनाचे गुण ग्राह्य न धरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लोकसभेत याची घोषणा करण्यात आली होती. 

पूर्वरीक्षा येत्या 24 ऑगस्टला होणार आहे. या परीक्षेसाठी देण्यात येणा-या प्रश्नपत्रिका निर्णय होण्यापूर्वीच तयार करण्यात आल्यात. या प्रश्नपत्रिकेत इंग्रजीतील प्रश्नांचा समावेश आहे. मात्र, हे प्रश्न सोजडवले नाहीत तरी चालतील असं आवाहन आयोगान केलंय. ही प्रश्नपत्रिका एकूण 200 गुणांची असेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.