दरभंगा जिल्ह्यात पावसामुळे नदीचं रौद्ररुप

दरभंगा जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं नदीनं रौद्ररुप घेतलंय. या पुरामध्ये अडकलेल्या एका युवकाची दृश्य आपण पाहू शकताय. हा युवक सुरुवातीला पाण्यात वाहून गेला. मात्र नंतर त्याचवेळी त्यानं प्रसांगवधान राखत झाडाला पकडलं.

Updated: Aug 17, 2014, 05:04 PM IST
दरभंगा जिल्ह्यात पावसामुळे नदीचं रौद्ररुप

बिहार : दरभंगा जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं नदीनं रौद्ररुप घेतलंय. या पुरामध्ये अडकलेल्या एका युवकाची दृश्य आपण पाहू शकताय. हा युवक सुरुवातीला पाण्यात वाहून गेला. मात्र नंतर त्याचवेळी त्यानं प्रसांगवधान राखत झाडाला पकडलं.

झाडाच्या साह्यानं त्यानं कसरत करत आपला जीव वाचवण्याची धडपड सुरु होती. त्याला वाचवण्यासाठी त्यांच्या गावताले तिघं जण झाडाजवळ आले, पण त्यानं  घाबरुन झाडावर उतरण्यास नकार दिला.

अखेर जवळच्या गावातनं बोट मागवण्यात आली. गावक-यांनी कशीबशी समजूत काढून या युवकाला झाडावरुन उतरवलं आणि त्याची सुखरुप सुटका केली. या पुरातून हा युवक वाचला. पण दरभंगा जिल्ह्यातल्या अनेक घरांचं पुरामुळे नुकसान झालं असून शेकडो जण बेघर झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.