डेटॉलपेक्षा लघवी भारी, लालूप्रसाद यादव यांचं वादग्रस्त वक्तव्य

धरण भरण्याबाबत अजित पवारांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य, त्यानंतर झाडांच्या वाढीसाठी लघवीचा वापर करा म्हणणारे नितीन गडकरी, अशा वक्तव्यांमध्ये आता भर पडली आहे, ती आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची.

Updated: Feb 1, 2016, 06:33 PM IST
डेटॉलपेक्षा लघवी भारी, लालूप्रसाद यादव यांचं वादग्रस्त वक्तव्य title=

पाटणा : धरण भरण्याबाबत अजित पवारांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य, त्यानंतर झाडांच्या वाढीसाठी लघवीचा वापर करा म्हणणारे नितीन गडकरी, अशा वक्तव्यांमध्ये आता भर पडली आहे, ती आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची.
लघवी ही डेटॉलपेक्षा प्रभावी आहे, असं वादग्रस्त वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी केलं आहे. आम्ही लहान असताना काही लागलं तर तेव्हा डेटॉल नव्हतं, आम्ही लागलेल्या ठिकाणी लघवीच लावायचो, असं लालू म्हणाले आहेत. त्यामुळे जखम बरी व्हायची असा दावाही त्यांनी केला आहे. 

पाहा लालूंचं ते वक्तव्य