एटीएमद्वारे करा स्पीडपोस्ट!

एटीएमद्वारा वजन केल्यानंतर क्षणात तुम्हाला स्पीडपोस्ट पाठवता येणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खिडकीत रांग लावण्याची किंवा ठराविक वेळेत उपस्थित राहण्याची तसदी घेण्याची आता तुम्हाला गरज राहिलेली नाही.  भारतीय टपाल खात्याने ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, आंध्र प्रदेश प्रभागामध्ये ही सेवा सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. 

Updated: May 5, 2015, 09:49 AM IST
 एटीएमद्वारे करा स्पीडपोस्ट! title=

हैदराबाद : एटीएमद्वारा वजन केल्यानंतर क्षणात तुम्हाला स्पीडपोस्ट पाठवता येणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खिडकीत रांग लावण्याची किंवा ठराविक वेळेत उपस्थित राहण्याची तसदी घेण्याची आता तुम्हाला गरज राहिलेली नाही.  भारतीय टपाल खात्याने ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, आंध्र प्रदेश प्रभागामध्ये ही सेवा सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. 

आतापर्यंत आपण एटीएमद्वारे पैसे काढत होतो. पण आता एटीएमचा वापर स्पीड पोस्टद्वारे पार्सल आणि पत्रव्यवहारासाठीसुद्धा करता येणार आहे. या संदर्भात टपाल खाते स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी करार करणार आहे. या कराराअंतर्गत एसबीआय आंध्र प्रदेशामध्ये ९५ एटीएम उपलब्ध करणार आहे. सध्या टपाल खात्याने "पोस्ट ऑफिस सेव्हिंग सेवे‘च्या एटीएमसाठी एसबीआयशी करार केलेला आहे.

एटीएमद्वारे स्पीडपोस्ट करण्याची योजना
मशिनवर स्पीड पोस्ट बुकिंगचे ऑप्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर जवळच वजन मोजणारे मशिनवर आपले स्पीड पोस्ट पाकीट ठेवल्यास त्यासाठी लागणारी रक्कम एटीएम मशिनच्या स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर एटीएम मशीनमधून निघालेली स्लीप आपल्याजवळ ठेवून पाकीट एटीएम मशिनमध्ये टाकले, की आपले काम संपेल.

टपाल खात्याच्या या नवीन योजनेअंतर्गत स्पीड पोस्ट करण्यासाठी पोस्टात जाण्याऐवजी आपल्या जवळच्या एसबीआय एटीएम सेंटरवर हे काम करता येणार आहे. एटीएमवरून स्पीड पोस्ट करण्यासाठी दोन मिनिटांचा अवधी लागेल. एटीएम  यानंतर डाक विभाग एटीएममधून ते पाकीट घेऊन आपल्या इच्छित स्थळी पोहोचवणार आहे. ही सेवा तूर्तास आंध्र प्रदेशपुरती मर्यादित असून लवकरच ती महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातसह इतर राज्यांमध्ये सुरू करण्याचा टपाल खात्याचा प्रयत्न आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.