पन्ना इथं बस पूलावरून पडली, 35 जणांचा जळून मृत्यू

एका खाजगी कंपनीची बस नाल्यात पडल्यानं आग लागून त्यातील 35 प्रवाशांचा जळून मृत्यू झालाय. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पांडव झऱ्याजवळ घडली.

Updated: May 4, 2015, 10:03 PM IST
पन्ना इथं बस पूलावरून पडली, 35 जणांचा जळून मृत्यू title=

पन्ना, मध्य प्रदेश: एका खाजगी कंपनीची बस नाल्यात पडल्यानं आग लागून त्यातील 35 प्रवाशांचा जळून मृत्यू झालाय. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पांडव झऱ्याजवळ घडली.

अतिरिक्त पोलीस अधिक्षक आर. डी. प्रजापति यांनी सांगितलं, 'आम्ही आतापर्यंत 15 जळालेले मृतदेह बाहेर काढले आहे. बस सतनाहून छत्तरपूरला जात होती.' जखमी 13 जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

प्रजापति यांनी सांगितलं की, बस पूलाहून 16 फूट खाली पडली. त्यामुळं बसच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाला आणि आग लागली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. बचावकार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.