हेलिकॉप्टर अपघात : ९ जवान शहीद, दोन महाराष्ट्रातील

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील सर्व २० जण मृत्युमुखी पडल्याचं स्पष्ट झालं आहे. यात दोन महाराष्ट्रीय जवानांसह ९ जवान शहीद झालेत. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर, आणि फ्लाईंग डेटा रेकॉर्डर सापडला आहे. त्यामुळे अपघातचे नेमके कारण कळू शकणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 26, 2013, 01:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील सर्व २० जण मृत्युमुखी पडल्याचं स्पष्ट झालं आहे. यात दोन महाराष्ट्रीय जवानांसह ९ जवान शहीद झालेत. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर, आणि फ्लाईंग डेटा रेकॉर्डर सापडला आहे. त्यामुळे अपघातचे नेमके कारण कळू शकणार आहे.
गौरीकुंडमध्ये अपघातग्रस्त झालेल्या एमआय-१७ व्ही ५ या हेलिकॉप्टरमध्ये दोन महाराष्ट्रीय जवान शहीद झालेत. यात कॅप्टन शशीकांत पवार, कॅप्टन गणेश अहीरराव अशी त्यांची नावं आहेत. कॅप्टन पवार धुळे जिल्ह्यातील बेटावत तालुक्यातील तर कॅप्टन अहिरराव जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे रहिवासी आहेत. दोघंही NDRFचे जवान आहेत. त्यांचं पार्थिव आज किंवा उद्या राज्यात आणलं जाईल आणि त्यांच्यावर लष्करी इतमामात त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती आहे.
या हेलिकॉप्टरमधले सर्व, २० जवान शहीद झाल्याचं स्पष्ट झालंय. यामध्ये NDRFचे नऊ, ITBP चे सहा, तर हवाई दलाच्या पाच जवानांचा समावेश आहे. दरम्यान, या हेलिकॉप्टरचा कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आणि फ्लाइंग डेटा रेकॉर्डर सापडल्यामुळे अपघाताचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता बळावली आहे.

अन्य शहीद जवानांमध्ये विंग कमांडर डेरेल कॅस्टेलिनो, फ्लाईट लेफ्टनंट तपन कपूर, फ्लाईट लेफ्टनंट के. प्रवीण, सार्जंट सुधाकर यादव आणि JWO ए.के. सिंग यांचा समावेश आहे.
उत्तराखंडात बद्रीनाथमध्ये अजूनही हजारो पर्यटक अडकून पडले आहेत. केदारमधील बचावकार्य संपलं असलं तरी बद्रीनाथमध्ये अजूनही हजारो पर्यटक अडकून पडले आहेत. यात महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. हवामानाच्या अडथळ्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होतायेत. नऊ दिवस उलटून गेले तरी या पर्यटकांची सुटका होऊ शकलेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.