वैष्णोदेवीचं दर्शन होणार अधिक सोपं

येत्या नवरात्रीमध्ये वैष्णोदेवी यात्रेला जाण्याची इच्छा असलेल्या भाविकांचं दर्शन अधिक सोपं होण्याची शक्यता आहे... वैष्णोदेवी श्राईन बोर्डानं आता नवा तिसरा रस्ता तयार केला आहे. त्यामुळे चढण वाचणार आहेच शिवाय या मार्गावर अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेलाय.

Updated: Aug 23, 2016, 10:48 AM IST
वैष्णोदेवीचं दर्शन होणार अधिक सोपं  title=

नवी दिल्ली : येत्या नवरात्रीमध्ये वैष्णोदेवी यात्रेला जाण्याची इच्छा असलेल्या भाविकांचं दर्शन अधिक सोपं होण्याची शक्यता आहे... वैष्णोदेवी श्राईन बोर्डानं आता नवा तिसरा रस्ता तयार केला आहे. त्यामुळे चढण वाचणार आहेच शिवाय या मार्गावर अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेलाय.

माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डानं प्रथमच यात्रेच्या पारंपारिक मार्गापेक्षा भिन्न रस्ता तयार केलाय. बालिनी ब्रीज ते अर्धकुंवारी असा 7 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. चेकपॉइंट आणि शेडचं काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग भाविकांसाठी खुला होईल. कटरा ते भवनपर्यंतचा मार्ग आणि सुविधांची जबाबदारी श्राईन बोर्डावर आहे.