हैदराबाद : सावधान हुडहुड वादळ आलंय...! होय हुडहुड वादळ तुफानी वेगानं भारताच्या आध्रं आणि ओडिशाच्या किनारपट्टीकडे कूच करतंय. हे वादळ विशाखापट्टनमच्या किनारपट्टीवर आज सकाळी धडकलंय. किनारपट्टीवर तुफानी वा-यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
वादळाशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रीय आपत्तीव्यवस्थापनाने कंबर कसलीय. केंद्रीय एजंसीस प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास तयार असल्याचं समजतय. हुडहुड वादळापासून बचावासाठी तब्बल सव्वा लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलय. शाळा आणि कॉलेजना सुट्टी देण्यात आलीय, तर अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्यात.
ताशी १९५ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने हुडहुड वादळ दुपारनंतर आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडक देणार आहे. आंध्र प्रदेशातील पाच जिल्ह्यांतून १ लाख ११ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून आणखी पाच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी नेले जाणार आहे. आपत्कालीन स्थितीस सामोरे जाण्यासाठी लष्कर आणि नौदलास सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आंध्र पदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीच्या दिशेने जवळ येत असलेल्या हुडहुड चक्रीवादळशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने कंबर कसलीय. या साठीच एका बैठकिचं आयोजन करण्यात आलं होत आणि त्यात याबाबतचा आढावा घेण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.