हुडहुड

फेसबुकवरील पोस्टमुळे एकाला अटक

फेसबुकवर बेजबाबदारपणे लिहणे एका युवकाला महाग पडले आहे.  ‘हुडहुड‘ वादळाबद्दल फेसबुकवर पोस्ट लिहिणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. 

Oct 29, 2014, 07:25 PM IST

आंध्र प्रदेशला एक हजार कोटींची मदत जाहीर

 हुडहुड वादळाचा तडाखा बसलेल्या आंध्र प्रदेशला पंतप्रधानांकडून एक हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली.तर मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख देण्यात येणार आहे. हुडहुड वादळाचा तडाखा बसलेल्या भागाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दौरा केला. त्यांच्यासोबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू त्यांच्यासोबत होते.

Oct 14, 2014, 04:47 PM IST

हुडहुडमुळे 24 जणांचा मृत्यू, पाहणीसाठी पंतप्रधान आज आंध्रला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हुडहुड चक्रीवादळानं झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विशाखापट्टणमला जातायेत. आंध्र प्रदेश आणि ओडिशा मधील समुद्र किनाऱ्यांवर वादळामुळं खूप नुकसान झालंय.  

Oct 14, 2014, 01:13 PM IST

‘हुडहुड’ चक्रीवादळाचा दणका, सहा जणांचा मृत्यू

हुडहुड चक्रीवादळाचा फटका आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना बसलाय. या जिल्ह्यांत झालेल्या जोरदार पावसानं आणि जवळपास २०० किलोमीटर प्रती तास धावणाऱ्या वाऱ्यामुळे रविवारी सहा लोकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तर विशाखापट्टनममध्ये सर्वाधिक लोकांना या तडाख्याचा फटका बसलाय. 

Oct 13, 2014, 07:56 AM IST

आंध्र, ओडिशात हुडहुड वादळ, लोकांची धडधड वाढली

 सावधान हुडहुड वादळ आलंय...! होय हुडहुड वादळ तुफानी वेगानं भारताच्या आध्रं आणि ओडिशाच्या किनारपट्टीकडे कूच करतंय. हे वादळ विशाखापट्टनमच्या किनारपट्टीवर आज सकाळी धडकलंय. किनारपट्टीवर तुफानी वा-यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

Oct 12, 2014, 08:53 AM IST

'हुडहुड' चक्रीवादळचा धोका, आंध्र- ओडिशामध्ये अलर्ट

एका रंगीत चिमणीच्या नावावरून ‘हुडहुड’ हे नाव मिळालेलं चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीकडे वेगानं आगेकूच करतंय. येत्या १२ ऑक्टोबरला ते आंध्रात दाखल होण्याची तसंच या प्रदेशात शनिवारपासूनच जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Oct 10, 2014, 08:07 AM IST