धक्कादायक : साक्षी महाराजांसमोर तरुणीला जीन्स उतरवायला लावली

भाजप खासदार साक्षी महाराजांचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.

Updated: May 5, 2016, 10:45 PM IST
धक्कादायक : साक्षी महाराजांसमोर तरुणीला जीन्स उतरवायला लावली  title=

नवी दिल्ली : भाजप खासदार साक्षी महाराजांचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.

या व्हिडिओमध्ये, स्त्रियांच्या घोळक्यात उभ्या असलेल्या एका तरुणीला साक्षी महाराजांसमोरच जीन्सची बटणं उघडण्यासाठी सांगण्यात आलं. 

काही बायका आपल्यावर पोलिसांकडून झालेल्या अन्यायाची तक्रार करण्यासाठी इथं दाखल झाल्या होत्या. यावेळी, या तरुणीला आपल्या अंगावरील जखमांच्या खुणा दाखवण्यासाठी पॅन्ट उतरवण्यास सांगण्यात आलं. 

उत्तरप्रदेशात ही घटना घडलीय. यावेळी अनेक पुरुषही उपस्थित होते.