महिलेवर उघड्यावर लघवी करण्याची वेळ आली आणि पुरूषांनी....

उघड्यावर पुरूषांना लघवी करतांना तुम्ही पाहिलं असेल, देशातील मुंबईपासून ते लहान-लहान शहरात, गावांमध्येही रस्त्याच्या बाजूला पुरूष सहज लघवी करतांना दिसतात.

Updated: Sep 20, 2015, 10:39 AM IST
महिलेवर उघड्यावर लघवी करण्याची वेळ आली आणि पुरूषांनी.... title=

नवी दिल्ली : उघड्यावर पुरूषांना लघवी करतांना तुम्ही पाहिलं असेल, देशातील मुंबईपासून ते लहान-लहान शहरात, गावांमध्येही रस्त्याच्या बाजूला पुरूष सहज लघवी करतांना दिसतात.

मात्र दिल्ली, मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये महिलांची सार्वजनिक शौचायलं फारच कमी आहेत. मुंबईत तर रेल्वे प्लॅटफॉर्मवरील शौचालयं जास्तच जास्त वेळेस बंद असतात, किंवा अस्वच्छ असतात.

अशा शहरातील महिलांची नेहमीच कुचंबणा होत असते, पुरूषांना उघड्यावर लघवी करतांना तुम्ही पाहिलं असेल, पण जगात कुठेच महिला हा प्रकार करत नाहीत. मात्र एखादी महिला जेव्हा असं करत असेल, तेव्हा पुरूष प्रधान संस्कृती मानल्या जाणाऱ्या जगात पुरूषांची काय प्रतिक्रिया असेल, ते या व्हिडीओत पाहा...

मुंबई सारख्या शहरांत महिलांसाठी ही सर्वात मोठी अडचण आहे. हा व्हिडीओ ही अडचण मांडण्याचा प्रयत्न आहे. मुंबईसारख्या शहरात रेल्वे स्थानकांसारख्या ठिकाणी स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छता गृह उभारले जावेत अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.

व्हिडीओ | महिलेवर उघड्यावर लघवी करण्याची वेळ आली आणि पुरूषांनी...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.